900 कोटी रुपयांचा प्लॅन आमच्या पदरात कधी पडणार, सुप्रिया सुळे यांचा सवाल; भर उन्हात रस्त्यासाठी आंदोलन

बनेश्वर रस्त्याची किमान डागडुजी तरी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच पीएमआरडीएचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार असा सवालही त्यांनी विचारला.

आज पुण्यात सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर रस्त्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, इथे सगळे आमचे लोक आलेत हे सगळ्यांच्या आस्थेचं ठिकाण आहे. गेले सहा महिने आम्ही पाठपुरावा करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा. दुर्दैवाने हे सरकार डागडुजीसुद्धा करायला तयार नाही. त्यांच म्हणणं आहे आमचा पीएम आरडीएचा मोठा प्लॅन आहे, अरे पीएमआरडीएचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार? आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो. दीड किलोमीटरच्या रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतय असेही सुळे म्हणाल्या.