![supriya sule](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/supriya-sule--696x447.jpg)
पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी एका सभेत केला होता. यानंतर मी शदर पवारांना कोणतीही नोटीस पाठवले नसल्याचे सुनील टिंगरे यांनी सांगितले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज सुनील टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस पत्रकार परिषदेत सर्वांसमोर दाखवली.
वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवली, म्हणून सुप्रिया सुळे खोटे सांगतायत. सहानुभूतीसाठी ताईचा खटाटोप चालू आहे. साहेबांना काय नोटीस पाठवली हे ताईने महाराष्ट्राला दाखवावे असे आव्हान दिले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पक्षाध्यक्ष म्हून शरद पवार यांना पाठविलेली नोटीस सर्वांसमोर दाखवून टिंगरे यांना चांगलाच दणका ठेवून दिला.