वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये निर्माणाधीन मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज घडली आहे. याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे.
‘एक्स’वर पोस्ट करत त्या म्हणल्या आहेत की,”प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होऊन दोन महिने देखील झाले नाहीत तोवर बीकेसी मेट्रो स्टेशन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान आणि इतरांनी तत्परतेने पोहोचून नागरीकांना बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला, याबद्दल त्यांचे कौतुक व मनापासून आभार.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”काही दिवसांपूर्वी पुण्यातही एक मेट्रो स्थानक अशाच पद्धतीने भस्मसात झाले. या घटनांवरुन मेट्रोच्या कामाबाबत शंका निर्माण होत आहे. बीकेसी हे जागतिक दर्जाचे व्यापारी केंद्र आहे. त्या स्थानकाच्या बाबतीत अशी घटना होते ही मोठी आश्चर्यकारक बाब आहे.”
सुळे म्हणाल्या, ”विशिष्ट व्यक्तींसाठी कामे अर्धवट असतानाही ओढूनताणून उद्घाटने करुन स्थानके खुली करण्यात आली आहे. त्याचे दुष्परिणाम नागरीकांना भोगावे लागत आहेत.”
प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होऊन दोन महिने देखील झाले नाहीत तोवर बीकेसी मेट्रो स्टेशन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान आणि इतरांनी तत्परतेने पोहोचून नागरीकांना बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला, याबद्दल त्यांचे कौतुक व मनापासून आभार. काही…
— Supriya Sule (@supriya_sule) November 15, 2024