सरकार वाल्मीक कराडला पाठीशी घालतंय, सुप्रिया सुळे यांचा आरोप

वाल्मीक कराडचे अवैध धंदे, संपत्ती असून त्याला ईडीने नोटीस पाठवली होती, तर कारवाई नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच वाल्मीक कराडला सरकार पाठीशी घालत आहे असा आरोपी सुळे यांनी केला.

एक्सवर पोस्ट करून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वाल्मिकी कराड याने फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर आज बारामती परिसरातील शेतकऱ्यांना देखील अशाच पद्धतीने सदर व्यक्तीने गंडा घातल्याचे उघड झाले. वाल्मीक कराड हा खंडणी, अवैध संपत्ती, अवैध धंदे, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अपराधी आहे. ईडीनेही त्याला नोटीस पाठवून देखील त्यावर कसलीही कारवाई झालेली नाही.

तसेच देशमुख कुटुंबीय आणि जनतेची तीव्र भावना असूनही शासन सदर व्यक्तीला पाठिशी घालत आहे. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असून राज्य शासन सदर व्यक्तीवर अजूनही कठोर कारवाई करताना दिसत नाही. शासन आणि तपाससंस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि पिडीतांना न्याय द्यावा अशी मागणीही सुळे यांनी केली.