अजित पवार यांचं आबा पाटील यांच्याविषयीचं विधान असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांची टीका

supriya-sule

आबा पाटील यांनी केसाने गळा कापला असे विधान अजित पवार यांनी केले होते. परंतु अजित पवार यांचे विधान अतिशय असंवेदनशील होते, मी आबा पाटील यांच्या पत्नीला फोन करून त्यांची माफी मागितली असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या. राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे असेही सुळे म्हणाल्या.

विरोधकांनी तेव्हा माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला असे अजित पवार एका सभेच म्हणाले. तसेच तेव्हा आर आर पाटील गृहमंत्री होते आणि त्यांनी या फाईलवर चौकशी करा असा शेरा देत सही केली होती. हा प्रकार म्हणजे केसाने गळा कापण्यासारखा आहे असे विधान अजित पवारांनी केले आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. अजित पवार यांचे विधान हे अतिशय असंवेदनशील आहे. मी आबा पाटील यांच्या पत्नीला फोन केला आणि त्यांची माफी मागितली. आबा पाटील यांचे निधन झाले तेव्हा मी तिथेच होते, आबा पाटील मला भावासारखे होते असे सुळे म्हणाल्या.

फडणवीसांनी केले होते आरोप

सिंचन घोटाळ्याचे आरोप हे देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते असे सुळे म्हणाल्या. तेव्हा आमचा पक्ष फुटला नव्हता. तेव्हा आम्ही अजित पवार यांच्यापाठी मागे खंबीरपणे उभे होतो. आता त्या फाईलचे काय झालं असा सवालही सुळे यांनी केला.