
महाराष्ट्रात सीबीएसई बोर्डाचा पॅटर्न राबवून एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव राज्य सरकार आखत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे.
सुळे यांना पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा असून ती बाजूला ठेवून सीबीएसई बोर्डाच्याअनुकरणाकडे होणारी वाटचाल अत्यंत वेदनादायक आहे. राज्याचे अस्तित्व दाखवणारे एसएससी बोर्ड (SSC Board) पूर्ण बंद करणे हाच उद्देश असावा, असे दिसते. महाराष्ट्राला संत- समाज सुधारकांची फार मोठी परंपरा आहे. संतांनी लोकशिक्षणाचे काम त्यांच्या अभंगांतून आणि कीर्तनातून केले आहे. असे असताना अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करताना अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी
भाषेला कितपत सन्मानाचे स्थान मिळेल ही शंकाच आहे. हा निर्णय मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला मारक असून ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रतल्या शाळांना ’सीबीएसई ’ पॅटर्न कशासाठी? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक होत नसल्याने शिक्षक आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत देखील मोठया प्रमाणावर विविध संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विचारवंत यांनी नकारात्मक भूमिका घेऊन त्यातील तांत्रिक दोष दाखवून देखील शिक्षण व्यवस्था आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात स्थलांतरित होऊन आलेल्या पालकांच्या गावाकडे जाण्याच्या नियोजनात बदल होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे आणि होणारी गैरसोय देखील सहन करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पत्रात केली आहे.
हा निर्णय मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला मारक असून ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रतल्या शाळांना ’सीबीएसई’ पॅटर्न कशासाठी? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक होत नसल्याने शिक्षक आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत देखील मोठय़ा प्रमाणावर विविध संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विचारवंत यांनी नकारात्मक भूमिका घेऊन त्यातील तांत्रिक दोष दाखवून देखील शिक्षण व्यवस्था आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात स्थलांतरित होऊन आलेल्या पालकांच्या गावाकडे जाण्याच्या नियोजनात बदल होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे आणि होणारी गैरसोय देखील सहन करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पत्रात केली आहे.