Liquor Policy Case : CM केजरीवाल यांना दिलासा मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी म्हणजे 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही वैध असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईडीच्या अटकेविरोधात Arvind Kejriwal यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तिहारमध्ये केजरीवालांना अमानूष वागणूक; पत्नीला प्रत्यक्ष का भेटू दिलं नाही? नेमकं काय घडलं

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने 10 एप्रिलला दिलेल्या निर्णयातून केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची ईडी अटक ही वैध ठरवली. केजरीवाल यांची अटक ही बेकायदेशीर नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते.

मोदी’राज’मध्ये हिंदुस्थान कर्जात बुडाला, 14 पंतप्रधानांनी केलं नाही ते मोदींनी ‘करून दाखवलं’!

21 मार्च झाली होती अटक

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गेल्या महिन्या 21 मार्चला अटक केलो होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत.