
कोरोना महामारीमुळे होणारे मृत्यू आणि लस घेतल्यानतंर दुष्परिणामांमुळे होणारे मृत्यू वेगवेगळे मानता येणार नाहीत. कोरोना लसीकरण मोहीम ही महामारी आल्यामुळेच राबवण्यात आली, त्यामुळे दोन्ही गोष्टी आपसात जोडलेल्या नाहीत असे तुम्ही म्हणू शकत नाही, अशा शब्दांत मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसानभरपाईवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान टोचले. तसेच कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबद्दलचे धोरण तयार करण्याचे आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही केंद्राला देण्यात आले.