
स्तन दाबने किंवा महिलेच्या पायजम्याची नाडी सोडणे हा बलात्कार नाही, सदर प्रकार हा लैंगिक छळ असल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात दिला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना चांगलेच झापले आहे. ”या प्रकरणातील न्यायमूर्तींचे मत हे अत्यंत असंवेदनशील व अमानूष असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई व न्यायमूर्ती जॉर्ज मसिह यांनी मांडले.
काय प्रकरण आहे?
10 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील पटियाली पोलिस स्टेशन परिसरात घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. यामध्ये एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, ती तिच्या 14 वर्षांच्या मुलीसोबत, रस्त्यात पवन, आकाश आणि अशोक या तीन तरुणांनी मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुचाकीवर बसवले. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपीने वाटेत एका कल्व्हर्टजवळ गाडी थांबवली आणि मुलीचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची नाडी तोडली. यानंतर, चुकीच्या हेतूने, त्यांनी तिला ओढायला सुरुवात केली. दरम्यान, आरडाओरडा ऐकून तिथे लोकांची गर्दी जमली. गर्दी जमताक्षणी आरोपी त्या मुलीला सोडून तिथून पळून गेले. आरोपीविरुद्ध बलात्कारासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयाने या कलमांखाली आरोपींविरुद्ध समन्स जारी केले.
भाडोत्रीचे पत्नीसोबत होते अनैतिक संबंध, पतीने त्याला जिवंत गाडला
न्यायाधीश काय म्हणाले?
”न्यायमूर्तींसाठी कठोर शब्द वापरावे लागत आहेत याचा आम्हाला खद आहे पण हे एक गंभीर प्रकरण आहे आणि न्यायमूर्तींनी अगदी काही क्षणात त्याचा निर्णय दिला. त्यांनी दिलेला निर्णय हा असंवेदनशील आणि अमानूष आहे. त्यामुळे या निर्णयावर आम्ही रोख आणत आहोत. तसेच त्याविषयीची नोटीस केंद्र व राज्य सरकारला बजावण्यात येईल.