पीएमएलए कायद्यांतर्गत किती जणांवर आरोप सिद्ध झाले? त्याचा दर नेमका किती आहे? एखाद्यावरील आरोप सिद्ध न होताच त्याला कितीही काळ तुरुंगात ठेवता येईल का? पीएलए कायद्यांतर्गत जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते; परंतु आतापर्यंत केवळ 41 प्रकरणांमध्येच शिक्षा झाली आहे. हे लक्षात घेतले तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कित्येक वर्षे तुरुंगात ठेवता? अशी प्रश्नांची सरबत्ती करत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच धारेवर धरले. तसेच आरोप सिद्ध न झाल्याने आणि मोठा काळ तुरुंगात घालवल्याच्या पार्श्वभूमीवर चौरसिया यांना अंतरिम जामीनही मंजूर केला. दरम्यान, बेकायदा खाणकाम हा पीएमएलए कायद्याखाली अधिसूचित गुन्हाच नसल्यामुळे या कायद्याखाली हरियाणातील काँग्रेसचे आमदार सुरेंदर पनवार यांच्यावर कारवाईच होऊ शकत नाही, असे ताशेरे ईडीवर ओढत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पनवार यांची अटकच रद्द ठरवली.