मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही मानवी हत्येपेक्षाही भयंकर, सर्वोच्च न्यायलयाने आरोपीला ठोठावला 4 कोटींचा दंड

प्रदुषणामुळे ताज महलचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने संरक्षित ठेवलल्या परिसरातील 454 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये दंग ठोठावला आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ”मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही मानवी हत्येपेक्षाही भयंकर”, असे परखड मत मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओका आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी या प्रकरणातील आरोपीची दंड कमी करण्याची याचिका फेटाळत त्याला फटकारले आहे.

”पर्यावरणाशी प्रकरणात माफी नाही. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही मानवी हत्येपेक्षाही भयंकर आहे. न्यायालयाची परवानगी न घेता संरक्षित जागेतील 454 झाडे तोडण्यात आली आहेत. एवढा मोठा हरित पट्टा पुन्हा निर्माण व्हायला किमान 100 वर्ष लागतील”, असे न्यायालयाने सांगितले.

शिव शंकर अगरवाल या व्यक्तीने ताज महलच्या आजुबाजुच्या संरक्षित जागेतली तब्बल 454 झाडे तोडली आहे. याप्रकरणी सेंट्रल एम्पावरर्ड कमिटीने अगरवाल यांच्यावर प्रत्येक तोडलेल्या झाडासाठी एक कोटींचा दंड ठोठवावा असे सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात म्हचटले आहे.

शिव शंकर अगरवाल यांना 18 सप्टेंबरच्या रात्री ताज ट्रॅफेझिअम झोन (ताजमहलसाठी संरक्षित झोन) मधील तब्बल 454 झाले तोडली. ही सर्व झाडे वनविभागाच्या अखत्यारितील होती. सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली ताजमहलची प्रदुषणापासून होणारी हाणी रोखण्यासाठी त्याच्या आसपासची जागा संरक्षित झोन म्हणून जाहीर केली होती. त्या जागेवरील वृक्षतोडीला बंदी असतानाही अगरवाल यांनी त्या जागेवरील 454 झाडे तोडली.