चौथ्यांदा याचिका म्हणजे कायद्याचा दुरुपयोग; सुकेशला दिलासा नाही

कारागृहातील परिस्थितीच्या आडून एकामागोमाग एक चौथ्यांदा याचिका करणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग आहे, असे स्पष्ट करत कथित ठक सुकेश चंद्रशेखर याची दिल्लीतील मंडोली कारागृहातून इतर कुठल्यातरी राज्यातील कारागृहात ठेवण्याबद्दलची याचिका सर्वेच्च न्यायालयाने फेटाळली. ज्याठिकाणी आपची सत्ता आहे त्या राज्यांतील कारागृह वगळता इतर कारागृहात ठेवावे अशी सुकेशची विनंती होती. परंतु, आता दिल्लीत आपची सत्ता नाही त्यामुळे तुमची याचिका निष्पळ ठरल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. मात्र, जेव्हा याचिकाकर्त्याने याचिकांमागोमाग याचिका केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले तेव्हा हा कायद्याचा अपमान आहे, अशी टिप्पणी करत सुकेशची याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्ता आता कायद्याच्या प्रक्रियेचा दुरूपयोग करण्याचा प्रयत्न करणार नाही अशी अपेक्षा आहे,  असे न्यायालयाने नमूद केले.