रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट परत करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने पॉडकास्टर आणि यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश आज दिले आहेत, जेणेकरून त्याला कामासाठी परदेशात प्रवास करता येईल. आसाम आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्याविरुद्धचा तपास पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतर न्या. सूर्य कांत आणि न्या. एन. कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने ही अट शिथिल करत रणवीर अलाहाबादियाला दिलासा दिला. पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस ब्युरोशी संपर्क साधण्यास खंडपीठाने सांगितले. 18 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले होते.