न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही, न्या. उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण मत

न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही, असे महत्त्वपूर्ण मत सर्वेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी शनिवारी व्यक्त केले. पुणे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी वकिलांनी आपली भूमिका चोख बजावली पाहिजे. यात कुठलीही तडजोड होता कामा नये. न्यायपालिकेवर कोणताही दबाव असता कामा नये. न्यायालयीन कामकाजात कोणाचा हस्तक्षेप असता कामा नये. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अतूट राहिले पाहिजे. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण व पालन करण्यासाठी वकिलांनी, विशेषतŠ तरुण वकिलांनी तत्पर राहिले पाहिजे, असा सल्लाही न्या. भुयान यांनी दिला.