नीट परीक्षेचे केंद्रनिहाय सर्व निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला निर्देश; पुढील सुनावणी 22 जुलैला

नीट यूजी पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआयला पुढे करून अजूनही हा घोटाळा झाकू पाहात असणाया सरकार आणि एनटीए परीक्षा यंत्रणेला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. परीक्षेच्या केवळ 45 मिनिटे आधीच पेपर फुटला, सर्व प्रश्न सोडवून विद्यार्थ्यांना पाठवलेही गेले याबद्दल खंडपीठाने अविश्वास व्यक्त केला. या परीक्षेचे केंद्र आणि शहरनिहाय निकाल विद्यार्थ्यांची ओळख उघड न करता शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बेवसाईटवर अपलोड करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

नीट परीक्षेतील एकूणच गैरप्रकार आणि अनियमिततेशी संबंधित 38 याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली. मात्र, परीक्षा रद्द करावी की नाही याबाबत खंडपीठाने तब्बल चार तास सुनावणी होऊनही निर्णय दिला नाही. पुढील सुनावणी सोमवार, 22 जुलै रोजी सकाळी 10.30 वा. सुरू करू. तरच दुपारपर्यंत काहीतरी निष्कर्ष काढता येतील, ठरवता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.

पाटणा एम्सचे 4 विद्यार्थी ताब्यात

पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पाटणा एम्समधील वैद्यकीय शाखेच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या खोल्या सील केल्या असून, विद्यार्थ्यांमध्ये तीन तृतीय, एक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत. सीबीआयचे पथक चौकशीसाठी सर्वांना सोबत घेऊन गेले. अटक करण्यात आलेले विद्यार्थी चंदन सिंग, राहुल कुमार आणि करण जैन हे 2021 च्या बॅचचे आहेत. तर कुमार सानू 2022 च्या बॅचचा आहे.

तरच फेरपरीक्षेचे आदेश

5 मे रोजी झालेल्या या परीक्षेसाठी 23 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. आधीची परीक्षा रद्द करून सर्वांची नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर, सुनियोजित पद्धतीने पेपरफुटी झाल्याचे पटवून दिले तरच फेरपरीक्षेचे आदेश देऊ. महाविद्यालयांतील प्रवेश क्षमतेनुसार नीटच्या कथित घोटाळ्यामुळे फक्त एक लाख आठ हजार परीक्षार्थीच बाधित होणार असताना, सर्व 23 लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा योग्य नसल्याचे मतही खंडपीठाने व्यक्त केले.

केंद्र आणि एनटीएला झापले

केंद्र सरकार/एनटीएने परीक्षेच्या दिवशीच सकाळी हजारीबाग (झारखंड) येथील एका केंद्रावर पेपर फुटला. सीबीआयच्या तपासानुसार, या केंद्रावर, एका व्यक्तीने सकाळी 8 ते 9.20 दरम्यान प्रश्नपत्रिकांचे पह्टो काढले. या प्रश्नपत्रिका नंतर सोडवल्या गेल्या आणि पैसे देणाया विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी उत्तरे पाठवली गेली. हे सर्व 45 मिनिटांत घडू शकते का, असे विचारत सरन्यायाधीशांनी  आश्चर्य व्यक्त केले. पाटणा पोलिसांच्या एफआयआरनुसार  परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटला होता. नंतर हे प्रकरण सीबीआयने ताब्यात घेतले, ही बाब समोर आल्यावर  बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाचे रेकॉर्ड पहायचे आहे, असे सांगत & केंद्रनिहाय निकाल प्रकाशित करण्याचे निर्देश दिले.

सीबीआयचे म्हणणे काय

काही केंद्रांवर परीक्षा सुरू होण्याच्या केवळ 45 मिनिटे आधी पेपर फुटल्याचे सांगणारे केंद्र सरकार आणि परीक्षेची आयोजक एनटीए यांच्या भूमिकेवर कोर्टाने शंका उपस्थित केली. परीक्षेच्याच दिवशी 45 मिनिटांत प्रश्नपत्रिका पह्डून सोडवलीही गेली आणि विद्यार्थ्यांकडे पाठवलीही गेली हे तुमचे सांगणे खूपच अविश्वसनीय वाटते, अशी खंडपीठाने तोंडी टिपणी केली,