
उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग असल्याचे सांगत रणवीर अलाहबादियाला आज सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियावर त्याचे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली. मात्र त्याचे स्वतःचे शो सभ्यता आणि नैतिकतेचे मानक राखतील, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक ते पॉडकास्ट पाहू शकतील, असे वचन न्यायालयाने रणवीरकडून लिखित स्वरुपात घेतले. दरम्यान, समय रैनाचे नाव न घेता न्यायालय म्हणाले, पॅनडामध्ये यांच्यापैकी एकाने कायदेशीर प्रक्रियेबाबत भाष्य केले. परंतु या तरुणांना वाटते ते ओव्हरस्मार्ट आहेत, अशा शब्दांत नराजीही व्यक्त केली.
या तरुणांना कदाचित आम्ही कालबाह्य झालेले वाटत असू, परंतु त्यांना या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कदाचित माहीत नसावे, आम्ही जर ठरवले तर बरेच काही करू शकतो. परंतु आम्हाला हे करायचे नाही. कारण ही तरुण मुले आहेत. आम्ही समजू शकतो, असेही न्यायालय म्हणाले. तुम्ही इथे तिकीट काढून आलात. त्यामुळे मला आता हिंदुस्थानात खटला लढवण्यासाठी पैसे मिळतील, अशी टीपण्णी समय रैनाने पॅनडात केली होती. त्यावरून न्यायालयाने सुनावणी दरम्यान नाराजी व्यक्त केली.