दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विनोद घोसाळकर यांना विभागातील सर्व जाती धर्मातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नुकताच विभागातील जैन समाजाने देखील त्यांना पाठिंबा दर्शवला.
1008 आदिनाथ बाहुबली श्री आचार्य मंदिर ट्रस्ट येथील जैन समाजाने नुकताच विनोद घोसाळकर यांचा सत्कार केला. यावेळी जैन मुनि आचार्य श्री विभव सागर महाराज यांनी विनोद घोसाळकर यांना आशीर्वाद दिला. तसेच घोसाळकर यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंदिराचे विश्वस्त महेंद्र शहा यांनी घोसाळकर यांनी जैन समाजासाठी आजवर केलेल्या कामांची स्तुती करून बोरिवली पश्चिम येथे उभारलेला भव्य आचार्य शांतीसागर चौक हे शिल्प नेहमीच येथील जैन समाजाला प्रेरणादायी ठरले आहे असे प्रतिपादन केले. तसेच दहिसर विधानसभेतील जैन समाज घोसाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील व त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी मंदिराचे विश्वस्त आशिष जैन, भरत शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाचा वापर समाजकारणासाठी करण्याची शिकवण आम्हाला सातत्याने दिली. त्यामुळे गेली अनेक वर्ष नगरसेवक, आमदार तसेच लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जनसेवेसाठी कोणत्याही गोष्टींची मी तडजोड केली नाही. म्हणून विभागातील सर्व जाती धर्मातील मतदारांचा मला उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय, असे विनोद घोसाळकर यावेळी म्हणाले.
संभाजी भोसले, ग्राहक संस्था महासंघाचे सेव्रेटरी यशवंत कदम, शिधावाटप कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष झुंजारराव झेंडे यांच्यासह सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.