आता जगाला ‘या’ नव्या आजाराचा धोका, 2050 पर्यंत 4 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू!

कोरोनानंतर आता आणखी एक नवीन आजाराचा धोका वाढला आहे. एका संशोधनात सुपरबग्सबाबत मोठा खुलासा झाला आहे. पुढील 25 वर्षांत जगभरात या आजारामुळे सुमारे 4 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. या आजारावर आताच नियंत्रण आणले नाही तर समस्या आणखी वाढू शकते. या सुपरबग्सला एमआर असे नाव देण्यात आले आहे.

लॅन्सेट जर्नलच्या अहवालात असे म्हटले आहे की 1990 ते 2021 दरम्यान या सुपरबगमुळे 10 लाख किंवा 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संशोधनात सांगण्यात आले आहे की, या सुपरबग्सवर बॅक्टेरीया किंवा अॅण्टीबायोटिकचाही प्रभाव होत नाही. अशात केवळ मृत्यूचा आकडा वाढू शकतो. मात्र, दिलासा देणारी बातमी अशी आहे की, अलीकडच्या काळात नवजात मुलांमधील संसर्ग कमी झाला आहे. जर मुलांमध्ये याचे संक्रमण झाले तर त्यावर उपाय फार मुश्किल आहे. 1990 ते 2021 या काळात 70 वर्षांवरील मृत्यू 80 टक्क्यांनी वाढले यावरून हा आजार किती भयानक आहे याचा अंदाज लावता येतो. 2021 मध्ये हा आकडा दुप्पट झाला.

2050 पर्यंत सुपरबग्समुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे होणारे मृत्यू 67 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. या संसर्गापासून वाचवण्यासाठी आतापासून आवश्यक पावले उचलावी लागतील, असे अहवालात म्हटले आहे. आताच प्रयत्न केले तर 2050 पर्यंत 92 दशलक्ष लोकांना वाचवता येईल. या सर्वेक्षणात 204 देश आणि प्रदेशांमधील 520 दशलक्ष लोकांच्या वैयक्तिक नोंदींचा समावेश करण्यात आला आहे.