सुनीता विल्यम्स अनोख्या पद्धतीने साजरा करणार नवीन वर्ष, अंतराळातून अनुभवणार 16 सुर्यास्त आणि सुर्योदय

2024 हे वर्ष आज संपणार आहे. आणि उद्यापासून नवीन वर्षांची सुरूवात होणार आहे. अशा वेळेला हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स 16 सुर्योदय आणि सुर्यास्त अनुभवणार आहेत. विल्यम्स या आपल्या काही सहकाऱ्यांसोबत स्टारलायनरच्या अंतराळात अडकल्या आहेत.

विल्यम्स आणि त्यांचे सहकारी पृथ्वीपासून 400 किमी वर उंचीवर आहेत त्यांचे यान दर 90 मिनिटांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतं. त्यामुळे 31 डिसेंबरच्या रात्री ते 1 जानेवारीपर्यंत विल्यम्स या 16 सुर्यास्त आणि सुर्योदय अनुभवतील.

सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी हे मार्चमध्ये परततील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विल्यम्स या फेब्रुवारीमध्ये परतणार होत्या, पण स्पेस एक्स क्रू 10 मिशनमुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले आहे.