सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास सुरू, ताशी 27 हजार किमी वेगाने पृथ्वीवर परतणार

हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर अखेर आज परतीचा प्रवास सुरू झाला. स्पेसएक्सच्या ड्रगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून त्या ताशी 27 हजार किमी वेगाने पृथ्वीवर परतणार आहेत. हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून वेगळे झाले असून हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार उद्या म्हणजेच बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे यान लँड होईल.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ महिने राहिल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अधिकृतपणे पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू केला. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ प्रवास केवळ 8 दिवसांसाठी होता. परंतु बईंगच्या स्टारलाईनर अंतराळयानातील तांत्रिक समस्यांमुळे त्यांचा मुक्काम वाढला. नासाने तत्काळ पर्यायी योजना आखल्याने दोन्ही अंतराळवीर आता स्पेसएक्स क्रू ड्रगन पॅप्सूलमधून परतीचा प्रवास करत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे.

n स्पेसक्राफ्ट जेव्हा वातावरणात प्रवेश करेल, तेव्हा याचा वेग ताशी 27 हजार किमी असेल.

n लँडिंगपूर्वी 18 हजार फूट उंचीवर दोन ड्रग पॅराशूट उघडतील आणि 6 हजार फुटांवर मुख्य पॅराशूट सक्रिय होईल.

n स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर समुद्रात स्प्लॅशडाऊन करेल. परंतु, हवामानात बदल झाल्यास लँडिंग लोकेशन बदलले जाऊ शकते. ही सगळी प्रक्रिया लाईव्ह पाहता येईल.

n सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील झूलासन या गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी राहिली.