सुनीता विल्यम्स सध्या काय करतेय?, पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाचा प्लॅन बी

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात अडकले आहेत. सुनीता आणि विल्मोर 6 जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले होते व 13 जूनला परतणार होते.परंतु सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास लांबल्याने सुनीता सध्या काय करतेय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर नासाकडून माहिती देण्यात आली आहे. सुनीता आणि बच विल्मोर स्पेस स्टेशनमध्ये नियमित कामे आणि वैज्ञानिक प्रयोगांचे संचलन करत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर सुरक्षित आहेत. नियमित जेवण, संचार करत आहेत. स्पेस स्टेशनमध्ये पॅकिंग, साफसफाई, तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करत आहेत. नासाचे फ्लाइट इंजिनियर मॅथ्यू डोमेनिक आणि इतर अंतराळवीर कचरा लोड करत आहेत. डोळ्यांवरील मायक्रोग्रॅविटीचा प्रभाव समजून घेत आहेत, असे नासाकडून सांगण्यात आले. स्टीव्ह स्टिच पुढे म्हणाले, नासा स्टारलायनरच्या मोहिमेचा कालावधी वाढविण्याचा विचार करत आहे; पण अजून अंतराळवीरांच्या परतीची तारीख ठरलेली नाही, असे नासाचे कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी म्हटले आहे.