
हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बूच विल्मोर हे दोघे गेल्या 10 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत, परंतु लवकरच हे दोघेही पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांच्या परतण्याची तारीख समोर आली आहे. हे दोघेही आता पुढील महिन्यात म्हणजेच 19 मार्चला पृथ्वीवर परत येतील, अशी माहिती नासाने दिली आहे. सुनीता आणि बूच विल्मोर हे दोघे बोइंगच्या स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून अडकले आहेत. हे दोघे केवळ 8 दिवस अंतराळात थांबणार होते, परंतु 10 महिन्यानंतरही ते अद्याप तेथेच आहेत. सुनीता आणि बूच यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग क्रू-10 मिशनच्या 12 मार्चला पृथ्वीवरून अंतराळात उड्डाण केल्यानंतर सुरू होईल. नासाची ही मोहीम सहा महिने असेल.
ट्रम्प यांचा मोठा दावा
सुनीता आणि विल्मोर हे दोघे अंतराळात अडकण्यामागे बायडन यांचे सरकार आहे. बायडेन यांच्या सरकारने या दोघांना अंतराळात मरण्यासाठी सोडून दिले आहे, असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांचे विधान योग्य असून हे दोघे राजकारणाचे बळी ठरल्याचा आरोप एलन मस्क यांनी केला. सुनीता आणि बूच यांना अंतराळात सोडण्यामागे राजकारण असून हे चुकीचे आहे, असे मस्क म्हणाले.