सुनीता विल्यम्सचे स्पेस सेंटरमध्ये जिम्नॅस्टिक
हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमध्ये जिम्नॅस्टिक करताना दिसत आहे. दुसरे अंतराळवीर भारोत्तोलन, रेस, डिस्कस थ्रो, शॉट पुट अशा अनेक खेळांमध्ये आपले काwशल्य दाखवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सुनीता गेल्या 52 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकली आहे.
इराकमध्ये गेलेले 50 हजार पाकिस्तानी बेपत्ता
पाकिस्तानहून धार्मिक यात्रेसाठी इराकला गेलेले जवळपास 50 हजार पाकिस्तानी बेपत्ता आहेत, अशी माहिती पाकिस्तानमधील मंत्री चौधरी सालिक हुसैन यांनी पाकिस्तानच्या सिनेट समितीच्या एका बैठकीत दिली. इराकला गेलेले हे भाविक अद्याप पाकिस्तानात परतले नाहीत. ते इराकमध्ये अवैधरीत्या काम करत आहेत, अशी भीती सरकारला आहे. या घटनेनंतर सरकारने अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा महापूर
अमरनाथ यात्रेने आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले. यावर्षी एका महिन्यापेक्षाही कमी वेळेत 4.51 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुफा मंदिराचे दर्शन घेतले. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.5 लाखांहून अधिक आहे.
कॅनडात हिंदुस्थान विरोधी घोषणाबाजी
कॅनडामध्ये हिंदुस्थान विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. किल इंडिया आणि दिल्ली बनेगा खलिस्तान अशी आक्षेपार्ह घोषणाबाजी लबर्टा प्रांतात पाहायला मिळाली. खलिस्तान समर्थक मोठय़ा प्रमाणात जमले होते.
बांगलादेशात पुन्हा मोबाईल इंटरनेट सुरू
बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर इंटरनेट आणि मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु सरकारने दहा दिवसांनंतर मोबाईल इंटरनेट सेवा सुरू केली.