दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांनी आज एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओतून सुनिता केजरीवाल यांनी गंभीर आरोप केला आहे. आंध्र प्रदेशातील एनडीएच्या एका खासदाराने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी खोटा जबाब दिला. या खोट्या जबाबाच्या आधारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली, असा आरोप सुनिता केजरीवाल यांनी केला आहे.
सुनिता केजरीवाल यांनी दोन मिनिटं 18 सेकंदाचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत सुनिता केजरीवाल यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहे. ‘केजरीवाल यांना अटक का केली तुम्हाला माहितीहे? एनडीएचे एक खासदार आहेत. मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी (MSR) यांच्या वक्तव्याच्या आधारावर केजरीवाल यांना अटक झाली आहे. MSR हे आंध्र प्रदेशातील एनडीएचे खासदार आहेत. 17 सप्टेंबर 2022 ला MSR च्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते’, असे त्या म्हणाल्या.
NDA के सांसद मंगुटा रेड्डी ने ED को जो पहले दो बार बयान दिए, वह ED को पसंद नहीं आए। इसके बाद ED ने उनके बेटे को गिरफ्तार कर लिया और पांच महीने तक जेल में प्रताड़ित किया।
बेटे और परिवार की हालत को देखकर मंगुटा रेड्डी ने अपना बयान बदल दिया और जो ED चाहती थी, वह अपने बयान में बोल… pic.twitter.com/hmKPILgyG1
— AAP (@AamAadmiParty) July 6, 2024
‘तुम्ही अरविंद केजरीवाल यांना सामील आहात का? असा प्रश्न MSR यांना तपासात विचारण्यात आला. 16 मार्च 2021 ला अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सचिवालायत भेटलो होतो. मला एक चॅरीटेबल ट्रस्ट उघडायची होती. त्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जमिनी संदर्भात भेटलो होतो. केजरीवाल यांनी त्यावेळी नायब राज्यपालांना निवेदन देण्यास सांगितले होते. पण ईडीला MSR यांचा हा जबाब पटला नाही. ईडीने काही दिवसांनी MSR च्या मुलाला अटक केली. MSR ने तेच सांगितले जे आधी सांगितले होते. त्यामुळे राघव रेड्डी याचा जामीन नाकारला गेला. या धक्क्याने राघवची पत्नी MSR यांच्या सुनेने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्या आजारी पडल्या. राघव पाच महिने तुरुंगात होता. कुटुंबाची स्थिती पाहून MSR ने 17 जुलै 2023 मध्ये आपला जबाब बदला. 16 मार्च 2021 ला केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेलो होतो. चार-पाच मिनिटं बोलणं झालं. मी दालनात जाताच केजरीवाल म्हणाले, तुम्ही दिल्लीत मद्य विक्रीचे काम सुरू करा. बदल्यात आम आदमी पार्टीला 100 कोटी रुपये द्या. केजरीवाल यांची ही पहिली आणि शेवटची भेट होती’, असा खोटा जबाब MSR ने दिल्याचे सुनिता केजरीवाल म्हणाल्या.
‘MSR भेटले त्यावेळी केजरीवाल यांच्या दालनात 10-12 जण बसलेले होते. कोणाकडून पैसे मागायचे असते तर सर्वांसमोर मागितले असते का? तेही अनोळखी माणसाकडून? असा सवाल सुनिता केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसेच मुलाची तुरुंगातून सुटका करण्यासाठी MSR ने खोटा जबाब दिला. यामुळे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एक मोठे राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे. केजरीवाल हे एक सामान्य आणि सुशिक्षित देशभक्त आणि कट्टर प्रमाणिक व्यक्ती आहेत’, असे सुनिता केजरीवाल म्हणाल्या.