
चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात रस्ता बनविताना सैन्य दलाचे वाहन 400 ते 500 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघात जवान सुनील विठ्ठल गुजर यांना वीरमरण आले. ते 2019मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. 110 इंजिनीअर रेजिमेंट बॉम्बे इंजिनीअर ग्रुपचे जवान सुनील गुजर हे ‘डोजर ऑपरेटर’ म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दुपारी चीन सीमेवर अरुणाचलमध्ये रोड कटिंग करताना त्यांचा डोजर स्लायडिंग होऊन 400 ते 500 फूट खाली कोसळला. त्या अपघातात सुनील गुजर शहीद झाले.