
”महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत, पण राज्याचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावर काहीही बोलत नाहीत. हा फक्त महाराजांचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा अपमान आहे. महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांना, त्यांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
राज्याच्या अर्थकारणावर भाष्य करताना सुनील प्रभू म्हणाले की, ”राज्यातील अर्थकारण पूर्णपणे ढासळलेलं आहे. राज्यवार 8 लाख कोटींचं कर्ज आहे, यातच इतक्या मोठ्या पुरवणी मागण्या आणल्या आहेत. मग बजेटमध्ये नेमकं हे सरकार काय करणार आहे? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे स्थिर असं कुठलंही व्हिजन नसलेलं, हे सरकार आहे.”