सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी मर्जीतल्या पंपनीकडून मशीन्स खरेदी करण्यासाठी जाचक अटी घातल्या. मध्य प्रदेश सरकारने काळय़ा यादीत टाकलेल्या कंपनीकडून 80 डिजिटल एक्स रे मशीन्स खरेदी केल्याचा खळबळजक आरोप शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. सार्वजनिक आरोग्य विभागाने या खरेदीची चौकशी करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी यावेळी केली.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी आरोग्य विभागाचे वाभाडेच काढले त्याचवेळेस आरोग्य सेविका व आशा सेविकांचेही प्रश्न मांडले. निकृष्ट दर्जाच्या मशीन पुरवणाऱया आपल्या मर्जीतील इदुसॉफ्ट हेल्थकेअर प्रा. लिमिटेड कंपन्याना पंत्राट देण्याचे आदेश काढण्यात आले. त्यासाठी जाचक अटी टाकण्यात आल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाने 23 लाख रुपयांचे मशीन 28 लाख रुपयांना खरेदी केले. आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्य विभागात उच्च न्यायालयाने पालिकेच्या आरोग्य सेविकांना किमान वेतन भविष्य निर्वाह निधी लागू करण्याचे आदेश देऊनही अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार 2015पासून हे फायदे द्यावेत, प्रसूतीविषय कायद्याने जे फायदे येतात ते लागू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.