दिंडोशीतील नागरी समस्या सुटणार, सुनील प्रभू यांची पालिका आयुक्तांशी चर्चा

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला 120 फूट रुंद विकास नियोजन रस्ता बांधून खुला करणे, संस्कार कॉलेज ते जीजी महाळकरी मार्ग यांना जोडणारा रस्ता, आप्पा पाडा रिक्षा स्टॅण्ड ते लोखंडवाला, क्रांतीनगर डीपी रोड, बॉटल काढून रस्ते रुंद करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, वनखात्याच्या जागेवरील झोपडय़ांना मूलभूत सुविधा यासारखी कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. यासंदर्भात शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली.

दिंडोशी विधानसभेतील विविध पायाभूत आणि नागरी समस्यांबाबत सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 41मधील महापालिकेच्या राखीव भूखंडावर प्रसूतीगृहांसोबत लहान मुलांचे रुग्णालय, स्त्राrरोग रुग्णालय, चिकित्सा पेंद्र, एनआयसीयूसह प्राथमिक आरोग्य पेंद्र आणि रुग्णालय बांधण्याबाबतच्या कामाचीदेखील माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण, कबड्डी महर्षी शंकर बुवा साळवी मैदानाचे नूतनीकरण, विजय साळस्कर उद्यानाबाबत चर्चा करण्यात आली. पारेखनगर पालिका शाळेत मुंबई पब्लिक स्कूल सुरू करणे, जलतरण तलाव सुविधा निर्माण करणे, पुंदनलाल सैगल नाटय़गृहाला पूर्ण क्षमतेने कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याची मागणीदेखील प्रभू यांनी यावेळी केली. बैठकीला सहआयुक्त चंद्रशेखर चौरे, उपायुक्त संजय महाले, सहआयुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त पी-उत्तर पुंदन वळवी, उपायुक्त चंदा जाधव, माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शिवसेना उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, गणपत वारीसे, भाई परब, शाखाप्रमुख संदीप जाधव, विजय गावडे, अशोक राणे, मनोहर राणे, रमेश कळंबे, रामचंद्र पवार, संपत मोरे यांच्यासह प्रमुख अभियंता रस्ते, प्रमुख अभियंता मलनिस्सारण वाहिन्या, अभियंता पर्जन्य जलवाहिन्या, कार्यकारी आरोग्य अधिकारी उपस्थित होते.