टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे. सुनील मित्तल यांना गेल्या वर्षी वार्षिक 15 कोटी रुपये मिळत होते. परंतु, आता त्यांना वार्षिक 32 कोटी रुपये मिळणार आहेत. भरमसाठ पगारवाढ झाल्यानंतर सुनील मित्तल यांचा हिंदुस्थानात सर्वात जास्त पगार मिळणाऱया सीईओच्या यादीत समावेश झाला. मित्तल यांच्याशिवाय, कंपनीचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांच्या पगारातही 10 टक्के वाढ झाली आहे. त्यांना वार्षिक 18.5 कोटी रुपये मिळतील.