धोनीच्या मनगटात आजही चेंडू स्टॅण्डमध्ये भिरकावण्याची ताकद

महेंद्रसिंग धोनीच्या मनगटात आजही चेंडू स्टॅण्डमध्ये भिरकावण्याची ताकद आहे. त्यामुळे धोनी कधी निवृत्त होणार, हा प्रश्न विचारून त्याच्यावर दबाव का टाकायचा? धोनीसाठी वय हे केवळ एक संख्या आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीवर चर्चा करणे, प्रश्न विचारणे वायफळ असल्याचे मत खुद्द महान फलंदाज सुनील गावसकर यांनी मांडलेय. आयपीएलच्या आजवरच्या सर्व 18 मोसमात खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक म्हणजे धोनी. आयपीएल सुरू होताच सारे धोनीच्या निवृत्तीच्या मागे लागतात. प्रश्न विचारतात, पण हा माजी कर्णधार सर्वांचे अंदाज चुकवत आयपीएलमध्ये नेहमीच्याच जोशात खेळतोय. गावसकरांनी धोनीच्या फिटनेसचे काwतुक केले. ते म्हणाले, त्याच्यासाठी आजही वय केवळ एक आकडा आहे, एक संख्या आहे. तो आजही चेंडूला स्टेडिमयमध्ये त्याच ताकदीने भिरकावतोय. त्याची इतकी क्षमता असताना त्याला हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. त्याच्यावर हा दबाव का टाकायचा? असाही सवाल गावसकरांनी टीकाकारांना केला. 43 वर्षीय धोनीने चेन्नई सुपर किंग्जला पाचवेळा आयपीएल जिंकून दिलेय.