Ajit Pawar News : सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला, अजित पवारांची कबुली

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन आपली चूक झाली अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. आणि अजित पवार यांनी बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दीड लाख मताधिक्क्यांनी पराभव झाला. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक झाली अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली आहे.

अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की बारामतीमध्ये तुमची लाडकी बहीण कोण आहे? यावर अजित पवार म्हणाले की बारामतीमध्ये माझ्या सगळ्याच बहीण लाडक्या आहेत. राज्यात अनेक घरांत राजकारण आहे, पण राजकारण एका बाजूला आणि नाती एका बाजूला. बारातमतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी नाही द्यायला पाहिजे होती, ती चूक झाली. पण झालं ते झालं असे विधान अजित पवार यांनी केले आहे.