Summer Juice- उन्हाळ्यात पित्त डोकेदुखीच्या त्रासावर हा सरबत आहे रामबाण उपाय!

कोकणातील रतांबे म्हणजेच कोकम हे एक महत्त्वाचं फळ मानलं जातं. कोकणातील रतांबे बाजारात येतात तेव्हा,  कोकणचा हा रानमेवा घरी नेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. रतांब्यापासून कोकमचा रस बनवण्याची सुरुवात होते तेव्हा, घरा-घरातून केवळ कोकमाच्या सुवास दरवळु लागतो. कोकम हे एक औषधी फळ मानले जाते. त्याचे वैज्ञानिक नाव गार्सिनिया इंडिका असे आहे. स्वयंपाकात, मसाल्यात, औषधात आणि तेलाच्या स्वरूपात रतांब्याचा वापर केला जातो. कोकमचा रस देखील खूप चविष्ट असतो. पारंपरिक असा हा कोकम सरबत उन्हाळ्यात बहुतांश घरात पाहायला मिळतो. उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर, कोकम सरबत पिणे हे उत्तम मानले जाते.

 

कोकमचा सरबत उन्हाळ्यात पिण्याचे फायदे

 

कोकमचा सरबत पिण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

 

कोकम सरबत उन्हाळ्यात अतिशय गुणकारी मानला जातो, यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

 

कोकम सरबत नियमित पिल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.

 

कोकम सरबत जुलाबाच्या समस्येवर अतिशय उत्तम उपाय मानले जाते. कोकममध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात.

 

कोकम खाण्याचे फायदे

 

कोकम आपल्या आहारात समाविष्ट केल्यामुळे, चयापचय वाढतो. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

 

रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी कोकमचा रस पिणे फायदेशीर आहे.

 

कोकम फळ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. खरंतर, कोकममध्ये बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात. हे सर्व घटक हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे स्ट्रोक आणि हृदयरोग होण्याची शक्यता देखील कमी होते.