Summer Salad Recepies- सोमवार ते शनिवार ही वेगवेगळी सलाड तुमच्या आहारात समाविष्ट करा! वजनही कमी होईल

आपल्या आहारात उन्हाळ्यात सलाडचा भरणा हा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. सलाड आहारात असल्यामुळे, आपल्याला त्याचे खूप फायदे होतात. सलाड खाण्यामुळे पचनक्रिया सुधारण्या खूप मदत होते. तसेच सलाडमधील पोषक घटक आपल्या शरीरासाठी सुद्धा खूपच गरजेचे असतात. रोज आपण कोणती सलाड करावीत याकरता आपल्याला विचार करावा लागतो. म्हणूनच सोमवार ते शनिवार आपल्या आहारात या सलाडचा समावेश करा. म्हणजे तुम्हाला आज कोणते सलाड करू हा विचार येणार नाही.

सोमवार- टोमॅटो सलाड
दोन ते तीन टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. हे टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यानंतर यामध्ये दही घालून सेंधा मीठ घालावे. त्यानंतर जिरे पावडर घालून टोमॅटो सलाड फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावे.
फायदे– टोमॅटो सलाड खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. टोमॅटोमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होण्यास मदत होते.

 

 

मंगळवार-काबुली चणे सलाड
काबुली चणे उकडून घेतल्यानंतर, त्यामध्ये आवडीप्रमाणे काकडी किंवा टोमॅटो कापून घालावे. यामध्ये त्यानंतर दही घालून चांगले मिक्स करावे. वरुन सेंधा मीठ आणि जीरे पावडर घालून सर्व्ह करावे.
फायदे– काबुली चण्यात फायबर आणि जीवनसत्वाचे प्रमाण हे मुबलक असते. काबुली चणे हे प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी सुद्धा उत्तम मानले जातात.

 

बुधवार- काकडीचे सलाड
काकडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. काकडीमध्ये तुमच्या आवडीनुसार कांदा किंवा टोमॅटो बारीक चिरून घालावा. त्यानंतर दही घालून व्यवस्थित मिक्स करावे. त्यानंतर सेंधा मीठ आणि जीरेपूड घालून हे सलाड सर्व्ह करावे.
फायदे– काकडी ही उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. काकडीमुळे त्वचेचे आरोग्यही सुधारते.

 

 

गुरुवार- बीट रुट सलाड
बीट रुट सलाड करण्यासाठी बीट हे प्रथम उकडून घ्यावे. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करुन घ्यावेत. तुम्हाला हवे असल्यास बीट किसूनही घेऊ शकता. बीटामध्ये आवडीनुसार, कांदा, टोमॅटो घालावे. त्यानंतर त्यात दही घालून व्यवस्थित मिक्स करावे. वरुन सेंधा मीठ आणि जीरेपूड घालून सर्व्ह करावे.
फायदे– बीटामुळे आपली त्वचा ग्लो होण्यास मदत होते. बीट खाण्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते.

 

शुक्रवार- मूग सलाड
मूग सलाड करण्यासाठी मूग आधी उकडून घ्यावेत. मूगामध्ये हवे असल्यास, कांदा टोमॅटो चिरून घालावा. नंतर त्यामध्ये जीरेपूड, सेंधा मीठ घालावे. हवे असल्यास यामध्ये थोडी मिरची पावडरही घालावी.
फायदे– मोड आलेल्या मूगामध्ये कॅलरी कमी असते. तसेच फायबरचे प्रमाणही भरपूर असते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

 


शनिवार- गाजर सलाड
गाजर सलाड करण्यासाठी, गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे. किसलेल्या गाजरात तुम्हाला हवा असल्यास कांदा टोमॅटो चिरून घालावा. त्यानंतर यामध्ये दही मिक्स करावे. वरुन सेंधा मीठ, जीरेपूड घालून लिंबू पिळून सर्व्ह करावे.
फायदे– गाजर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच गाजरामुळे वजन कमी करण्यासाही मदत होते.