
शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सुखबीर सिंग बादल यांची निवड झाली आहे. गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि या वर्षी जानेवारीमध्ये त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता. अलीकडेच सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक नेत्यांना अकाल तख्त साहिबने शिक्षा सुनावली. पंजाबच्या हिताचे रक्षण करणे आणि अकाली दलाला अधिक मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे नव्याने अध्यक्ष होताच सुखबीर सिंग बादल यांनी सांगितले.