
मागील मोठय़ा कालावधीपासून तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला प्रायव्हेट जेट गिफ्ट केले आहे. कोटय़वधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे. आता त्याने मंडोली तुरुंगातून जॅकलीनसाठी व्हॅलेंटाइननिमित्त गिफ्टची व्यवस्था करत तिला पत्र लिहिले. सुकेश अनेकदा अभिनेत्रीला पत्र लिहित असतो. ’आपण एकत्र राहण्यापासून केवळ एक पाऊल दूर असल्यामुळे हा व्हॅलेंटाइन दिवस खूप खास आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम असून तू जगातील सर्वात उत्तम व्हॅलेंटाइन आहेस’, असे सुकेशने पत्राद्वारे म्हटले.