दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद असलेला ठग सुकेश चंद्रशेखर तब्बल 7 हजार 640 कोटी रुपयांचा कर भरणार आहेत. याबाबत त्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहीले आहे. सुकेशने त्याच्या परदेशातील उत्पन्नाची आकडेवारी दिली आहे. 2024-25 च्या हिंदुस्थान सरकारच्या योजनेच्या नियमांनुसार आपले उत्पन्न जाहीर करण्याबाबत आणि त्यावरील कर भरण्याबाबत उल्लेख केला आहे. त्याने त्याच्या परदेशातील उत्पन्नावर 7,640 कोटी रुपयांचा कर भरावयाचा आहे.
सुकेशकडे जवळपास 22,410 कोटी रुपयांची परदेशी मालमत्ता असून त्यावर त्याला कर भरायचा आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात त्याने दोन परदेशी कंपन्यांद्वारे ही कमाई केली आहे. सुकेशने त्याच्या एलएस होल्डिंग्स इंटरनॅशनल (नेवाडा, अमेरिका) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटिळ व्हर्जिन आयलँड्स) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. या दोन्ही कंपन्या 2016 पासून कार्यान्वित आहेत.