सुमारे 200 कोटींच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने आता करण जोहरला पत्र लिहिले आहे. सुकेशने धर्मा प्रॉडक्शनचे शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रात सुकेशने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचाही उल्लेख केला आहे. तो हा व्यवहार 48 तासांत रोख रक्कम देऊन करू शकतो आणि त्याला धर्मा प्रॉडक्शनमधील 50-70 टक्के हिस्सा खरेदी करायचा आहे, असे म्हटले आहे.
सुकेश चंद्रशेखरने ‘लेटर ऑफ इंटेंट’ लीगल फर्म अनंतमच्या माध्यमातून धर्मा प्रॉडक्शन आणि करण जोहरला पाठवले आहे. त्यात लिहिलंय की, तुम्ही धर्मा प्रोडक्शनसाठी गुंतवणूकदार शोधत आहात. माझी पंपनी एलएस होल्डिंग्स ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत आहे. आम्हाला आमच्या कंपनीचा विस्तार करायचा आहे.