सुजाता सौनिक बनणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव, आज स्वीकारणार पदभार

राज्याच्या मुख्य सचिव पदी वरिष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ आज संपला असून सौनिक या रविवारी (30 जून ) रोजी संध्याकाळी पाच वाजता पदभार स्वीकारणार आहेत. सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव असणार आहेत.

गहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी असलेल्या सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. सेवाज्यष्ठतेनुसार त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाचा सौनिक या जून 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत.

सुजात सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील सनदी अधिकारी होते. मनोज सौनिक देखील मुख्य सचिव होते. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्य सचिव पदी राहणारे ते पहिलेच पती पत्नी ठरले आहेत.

सुजाता सौनिक या मूळच्या चंदिगढच्या असून त्यांनी पंजाब विद्यापिठातून इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आङे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत असून त्यांनी अनेक पदांवर काम केलेलं आहे.