पॅरिस ऑलिम्पिकसाठी सुदीप बर्वे बॅडमिंटन पंच

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारासाठी पुण्यातील बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक सुदीप बर्वे यांची अंपायर (पंच) म्हणून निवड झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेले बर्वे हे देशातील एकमेव व्यक्ती होय. बर्वे यांची निवड पुणेकरांसाठीच नव्हे तर देशवासीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनतर्फे (बीडब्ल्यूएफ) सुदीप बर्वे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. बर्वे हे बुधवार (दि.24) पॅरिसला रवाना होतील. ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी झालेल्या निवडीविषयी आनंद व्यक्त करून बर्वे म्हणाले, बॅडमिंटन हा ‘पूना गेम’ या नावे ओळखला जात असे. 1870 सालापासून हा खेळ खेळला जाऊ लागला अशा नोंदी आढळतात.