
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सुधीर साळवी हे गेली 35 वर्षे कार्यकारिणीमध्ये असून 20 वर्षांपासून सातत्याने मंडळाचे मानद सचिव म्हणून यशस्वी नेतृत्व करीत आहेत. तसेच त्यांचे वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान असून ग्लेनईगल्स हॉस्पिटल आणि महर्षी दयानंद कॉलेजचे विश्वस्त म्हणूनदेखील ते काम पाहत आहेत.