लोकसभा निवडणूकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजप मिंधे सरकारने राज्यात लाडकी बहिण योजना आणली. या योजनेमार्फत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये दर महिना देण्यात आले. त्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही रक्क्म 2100 करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र आता भाजप मिंधे सरकार त्यांच्या शब्दावरून पलटले असून लाडकी बहिण योजनेचे वाढिव पैसे पुढच्या भाऊबीजेपासून सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सांगितले आहे. लोकसत्ताने याबाबत बातमी दिली.
लाडकी बहिण योजनेचं आश्वासन आम्ही 100 टक्के पूर्ण करणार. जर आम्ही वाढीव पैसे दिले नाही तर देशभरात चुकीचा संदेश जाईल व आमची प्रतिमा खराब होईल. मी मुख्यमंत्र्यांनाया बाबत पत्र लिहणार आहे. महायुतीच्या जाहिरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण करू. वाढीव रक्कम कधी द्यायची त्यावर चर्चा केली जाईल. गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे मुनगंटीवार म्हणाले.