मराठी शाळांत संस्कृत भाषा सक्तीची करा! महंत सुधीर महाराज पुजारी यांची मागणी

राज्यातील मराठी शाळांत संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संस्कृत भाषेमुळे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व निर्माण होण्यास मदत होईल. संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा केली होती, यावर संविधान समितीसमोर चर्चा झाली होती, याची नोंद अस्तित्वात आहे. भाषेवर सुरू असलेला इतर राज्यांतील वाद मिटविण्यासाठी संस्कृत भाषा शाळांमध्ये बंधनकारक करणे महत्त्वाचे ठरेल, तमिळींचाही संस्कृतला विरोध नसेल, असे महंत सुधीर पुजारी यांनी स्पष्ट केले.