वारं फिरलंय! मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का; माजी मंत्री, माजी उपमहापौरांनंतर माजी आमदाराचा पक्षाला रामराम

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वारे फिरले असून हेच वारे ओळखून अनेक जण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. नुकताच माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही तुतारी हाती घेतली आहे.

उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता. भाजप कार्यालयात भेट देऊन त्यांनी राजीनामा सुपुर्द केला होता. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भालेराव आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मराठवाड्यात भाजपला घरघर

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये धुव्वा उडाल्यानंतर मराठवाड्यात भाजपला घरघर लागली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांनीही भाजपची साथ सोडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह माजी नगरसेवकांनीही भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. आता माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही भाजपला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

सध्याचा भाजप व्यापारी, धनाढ्यांचा, स्त्रियांना पक्षात महत्त्व नाही; सूर्यकांता पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल