
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुभाष घई यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुभाष घई श्वास घेताना त्रास, अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येत असल्याने रूमलात दाखल करण्यात आलं, असं सांगितलं जात आहे. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.