दिल्लीत पुराचा कहर; कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानं तिघांचा मृत्यू, दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश

delhi-flood

दिल्लीत पावसानं कहर केला असून अनेक सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीच्या पश्चिम विभागातील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पुराचं पाणी अचानक शिरल्याने चार तासांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राजेंद्र नगरमधील व्हिज्युअल्सनी शनिवारी राऊच्या आयएएस स्टडी सर्कलचे तळघर पूर्णपणे भरलेले होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना शनिवारी संध्याकाळी 7.19 वाजता तळघरात विद्यार्थी अडकल्याचा फोन आला आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या.

बचावकार्य सुरू झाल्यानंतर दोन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तिसऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला.