
युवासेनेतर्फे शनिवारी आयोजित सीईटी, नीट सराव परीक्षेला राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीडशेहून अधिक सेंटरवर 29 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परिक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षा संपल्यानंतर सोल्यूशन सेट https://yuvasenacet.com या संकेतस्थळावरून आपला निकाल विद्यार्थ्यांना पाहता आला. याच संकेतस्थळावर सराव परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा संच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बारावीनंतर इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ व मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेशासाठी सीईटी आणि नीट या प्रवेशपरीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी व त्यांना पेपर सोडवण्याचा अनुभव मिळण्यासाठी युवासेनेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे सहावे वर्ष होते. या सराव परीक्षेसाठी राज्यातून जळगाव व चंद्रपूर जिह्यातून सर्वाधिक नोंदणी झाली तर मुंबईमधून बोरिवली, अंधेरी
पूर्व, वडाळा व मुंबादेवी या विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक नोंदणी झाली.
z संपूर्ण राज्यातून विधानसभानिहाय पेंद्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईतून 36, ठाणेसह कोकणामधून 37, उत्तर महाराष्ट्रात 22, पश्चिम महाराष्ट्रात 23, मराठवाडा 16 तसेच विदर्भातून 14 पेंद्र असे एकूण 150 पेक्षा अधिक परीक्षा पेंद्रे होती. एकूण 27 हजारांपेक्षा अधिक ऑनलाईन नोंदणी झाली होती. तसेच दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी नसतानादेखील थेट परीक्षा पेंद्रांवर येऊन परीक्षा दिली.