‘प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याची परवानगी द्यावी’, सुनील शिंदे यांची मागणी

विद्यार्थ्यांना 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

यावेळी बोलताना सुनील शिंदे म्हणाले की, ”राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर रद्द करून 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जात प्रमाणपत्र, पडताळणीसाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरला जात होता. आता मात्र 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने शासनाने विद्यार्थ्यांना 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.