सुटकेस उघडली, मुलगी निघाली; प्रेयसीला गुपचूप हॉस्टेलमध्ये नेण्याचा प्रियकराचा प्रयत्न फसला, Video व्हायरल

मुलांच्या हॉस्टेसमध्ये मुलींना प्रवेश नसतो. मात्र एका खासगी विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीला मुलांच्या हॉस्टेलमध्ये नेण्यासाठी शक्कल लढवली. पण त्याचा प्रयत्न चांगलाच फसला असून दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ हरयाणातील सोनीपत शहरातील आहे. येथे ओपी जिंदन विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारा तरुण मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहतो. प्रेयसीच्या भेटीसाठी आतूर झालेल्या तरुणाने तिला बोलावून घेतले आणि मुलांच्या हॉस्टेलमध्ये नेण्यासाठी एक शक्कल लढवली. तरुणाने प्रेयसीला एका मोठ्या सुटकेसमध्ये लपवले.

सुटकेस घेऊन हा तरुण मुलांच्या हॉस्टेलमध्ये दाखल झाला. पण हॉस्टेलमध्ये प्रवेश केल्यानंतर ओढून नेत असताना सुटकेस एका ठिकाणी जोरात आदळते आणि झटका बसतो. यामुळे सुटकेसमध्ये बसलेली तरुणी जोरात किंचाळते. मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलीचा आवाज ऐकून हॉस्टेलचे गार्ड आणि सुरक्षारक्षक खडबडून जागे होतात आणि तरुणाला थांबवतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गार्ड इतर सहकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही बोलावून घेतो. त्यांनतर दोन महिला कर्मचारी सुटकेस उघडतात आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण सुटकेसमध्ये एक तरुणी बसलेली असते. ती बाहेर येते तेव्हा तिला श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याचे दिसते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.