
एका नववीत शिकणाऱया 16 वर्षांच्या मुलीला परीक्षेला बसू देण्यात न आल्याने तिने निराश होऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे समोर आली आहे. 800 रुपये फी न भरल्याने तिला शाळेने परीक्षेला बसू दिले नव्हते. हा अपमान सहन न झाल्याने रिया प्रजापती हीने मृत्यूला कवटाळले.
रियाची आई पूनम देवी हिने कमला शरण यादव इंटर कॉलेजविरोधात तक्रार नोंदवली आहे. अवघे 800 रुपये शुल्क थकल्याने रियाला वार्षिक परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यास शाळेने नकार दिला होता. रिया शनिवारी परीक्षा देण्यास गेली असताना शाळेचे व्यवस्थापक संतोष कुमार यादव, मुख्याध्यापक राजकुमार यादव, कर्मचारी दीपक सरोज, धनीराम यांनी अपमानास्पद वागणूक दिली.