ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे सुरू झालेल्या 49 व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 18 सदस्यीय बलाढय़ संघ पाठवण्यात आला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी 8 मुले आणि 8 मुली व संघ व्यवस्थापक असा राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सांघिक व वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये या संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचा संघ ः 18 वर्षांखालील मुले (ज्युनियर गट) ः कौस्तुभ जागुष्टे, आयुष गरुड, महम्मद हसनैन अर्शद शेख, सार्थक केरकर, मुनावर अब्बास अन्वर अब्बास सय्यद, भाव्या सोलंकी. 21 वर्षांखालील मुले ः शेख फैझान अब्दुल रहिमान, अथर्व पाटील (राजेश निर्गुण, संघ व्यवस्थापक). 18 वर्षांखालील मुली (जुनियर गट) ः दीक्षा चव्हाण, मधुरा देवळ, रुची माचीवाले, आर्या घाणेकर, सिमरन शिंद, ज्ञानेश्वरी इंगुळकर. 21 वर्षांखालील मुली ः केशर निर्गुण, सखी दातार (संध्या देवळे, संघ व्यवस्थापक).